Deola | न्यायालयाच्या निर्णयानंतर भावडघाट ते गुंजाळनगर रस्त्याचे काम पुन्हा सुरू

0
2
Deola
Deola

सोमनाथ जगताप – देवळा : प्रतिनिधी | विंचूर- प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जी मार्गावरील भावडघाट ते गुंजाळनगर या रस्त्याच्या सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाचे काम सध्या कोणत्याही शेतकऱ्यांच्या जमिनीच्या हद्दीत नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्याने महामार्गाचे काम पोलीस बंदोबस्तात पुन्हा सुरू झाले आहे. मंगळवार (दि.११) रोजी रामेश्वर फाटा ते गुंजाळनगर या दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम चालू असल्याचे दिसून आले.
राष्ट्रीय महामार्ग कायदा अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याने अधिकाऱ्यांनी कोणतेही संपादन हाती न घेता दि. ७ मार्चपर्यंत उच्च न्यायालयाने सदरच्या कामाला मागील सात दिवस स्थगिती दिली होती.

सदर कामाला खोळंबा होऊ नये म्हणून यावर निर्णय घेत व या अनुषंगाने कामाला सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. भावडघाट ते रामेश्वरफाटा द्विगती मार्गाच्या दुसऱ्या लेनचे व रामेश्वरफाटा ते गुंजाळनगर चौपदरीकरनाचे काम गेल्या काही दिवसांपासून अधिग्रहण संभ्रमांमुळे रखडले आहे. मागील महिन्यातही दि. २१ फेब्रुवारी रोजी पोलिस बंदोबस्तात येथील महामार्गाचे काम सुरू झाले होते. परंतु याबाबत काहींनी उच्च न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने सदर महामार्गाच्या कामाला सात दिवसांची स्थगिती दिली होती.

Deola | भावडघाट ते गुंजाळनगर रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाला उच्च न्यायालयाची स्थगिती

मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने रामेश्वर फाटा ते भावडबारी या जुन्याच रस्त्यावरती महामार्गाच्या हद्दीतच आपण काम करीत आहोत. त्यामुळे संबंधित याचिकाकर्त्यांच्या क्षेत्रात आपण कुठल्याही प्रकारे काम करीत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. जर आपल्या जमिनी संदर्भात आपले काही म्हणणे याचिकाकर्त्यांना मांडायचे असेल तर आपण जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागण्याचा आपणास अधिकार असल्याचे नमूद केले आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत २० मार्च रोजी अंतिम सुनावणी असून याचिकेची यादी सादर करण्याचे नमूद करण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here