सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | ग्रुप ग्रामपंचायत खर्डे अंतर्गत मुलूखवाडी येथे महिलांसाठी शिवण कर्तन प्रशिक्षण घेण्यात आले असून, त्याचा समारोप सोमवारी दि. ३ रोजी करण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. याप्रसंगी सरपंच अर्जुन मोहन, माजी उपसरपंच सुनील जाधव, जितेंद्र पवार, संदीप पवार, निंबा निकम, समाधान देवरे, अरुण चव्हाण, ग्रामविकास अधिकारी योगेश पगार आदी पस्थित होते. प्रशिक्षणात भाग घेणाऱ्या महिलांना शिकवणकामाचे साहित्य वाटप कऱण्यात आले. ग्रामपंचायतीने महिलांसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे महिलांनी कौतूक केले. शिवण, कर्तन प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास मदत होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम