सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | इंडियन ऑलिम्पियाड हैदराबाद येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत दाभाडी येथील राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कु. सृष्टी संदीप पवार हिने राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला. तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला अबॅकस टीमच्या शिक्षिका योगिता पवार यांचे मार्गदर्शन लाभले. वाखारी ता. देवळा येथील व सध्या मानके येथील सौ. सुमनबाई दगा हिरे माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक संदीप पवार व जयश्री पवार यांची ती कन्या आहे. सृष्टी पवार हिची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल खर्डे येथील विकास सोसायटीचे संचालक वसंत जाधव, प्रहारचे कृष्णा जाधव, हनी बनी इंग्लिश मिडीयम स्कुलचे संचालक किरण जाधव, वैशाली जाधव आदींनी कौतूक केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम