सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | नेवासा (अहिल्यानगर) येथे नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत भावडे येथील एस.के.डी व व्ही.के.डी. विद्यालयाच्या संघांनी घवघवीत यश मिळविले. सदर स्पर्धेत विद्यालयाचे 14 वर्षाखालील व 17 वर्षाखालील मुलांच्या संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी 14 वर्षाखालील एकूण आठ संघ व 17 वर्षाखालील एकूण सात संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या संघांनी प्रथम क्रमांक मिळवत त्यांची राज्य पातळीवर निवड झाली तर 14 वर्षाखालील मुलांच्या संघाने तिसरा क्रमांक मिळविला. विजयी संघांना क्रीडाशिक्षक मुदस्सर सय्यद, यज्ञेश आहेर, धनंजय परदेशी, निलेश भालेराव, ययाती जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे,सचिव मीना देवरे, उपाध्यक्ष भूषण पगार, एसकेडी.चे प्राचार्य एस.एन. पाटील, व्हीकेडी. चे प्राचार्य एन.के.वाघ तसेच सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी सागर कैलास, बबलू देवरे यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम