सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील कर्म. रामरावजी आहेर महाविद्यालयात मराठी विभाग व विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने कुसुमाग्रज जयंती व मराठी राजभाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कवी राजन पवार म्हणाले कि, “माणूस जन्माला येतो, तेव्हाच भाषा घेऊन येतो, मराठी भाषा संत ज्ञानदेव, संत तुकोबा, चारवाहक, ज्योतिबा कुसुमाग्रज, कवी अनिल तर थेट आजच्या आधुनिक कवी संजय चौधरी, अनंत राऊत या सर्व उपासकांनी ती आधीच अभिजात केले आहे. सध्या कॉम्प्युटर, मोबाईलच्या जमाण्यात आपलं जगणचं विसरून जातो आहोत. आयुष्य हे मिठीत पडून मुठीत घेण्यासारखं असते.
माणसानेच देव, धर्म, जात, पंथ निर्माण केले आहेत. माणसाने जगतांना आस्तिक आणि नास्तिक कसाका होईना, समृद्ध जगणे महत्वाचे आहे. अगदी संत ज्ञानेश्वर, तुकोबा सारखं नास्तिक आणि चरवाहक, ज्योतिबा सारखं आस्तिक जगावं. “कवितेचं जगण्याशी नातं आणि नात्यात जगणारी कविता” याविषयावर त्यांनी आई, बाप, मुलगी, मित्र यावरील कुसुमाग्रज, अनंत राऊत, कवी आंधळे, कवी कमलाकर देसले, कवी रावसाहेब कुवर यांच्या कवितेतून उपस्थितांना समजावून दिला. कुसुमाग्रजांच्या ‘गाभारा’ या कवितेतून जागृत केले. तसेच कवी अनंत राऊत यांच्या ‘दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारवा सारखा’ या कवितेतून मित्राचे नाते सांगितले. मित्र हा आपलाच अवयव असतो असे ते सांगतात.
Deola | देवळा अभिनव व जनता विद्यालयात कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
आपण सर्वजण सुखात आईची आठवण काढतो, मात्र संकटाच्या वेळी बापाला आवाज देतो. मुलीबद्दल व्यक्त होतांना कवी संजय चौधरी यांनाची एक कविता ऐकवली, ते म्हणतात,’मला जर झाली मुलगी तर तिचे नाव मी सीता ठेवणार नाही, आणि झालीच मुलगी तर तीच लग्न रामाशी करणार नाही’ कवीने अशी कविता का? करावी असा प्रश्न उपस्थितांना विचारला. तसेच कवीला जागो जागी, कुणातही स्वतःची मुलगी दिसते. ते म्हणतात,’जागो जागी भेटत असते माझी मुलगी, कुणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी’ या कवितेतून बाप -लेकीचं नातं सुंदर रेखाटतात.कवी रावसाहेब कुवर म्हणतात, ‘माझ्या बापाला शहरात करमत नाही’ आणि सून, मुलगा, नातंवंड यांच्या मुळे आई -बापाची झालेली परवड मांडतात. कष्ट करणाऱ्या आई बद्दल सोस सोसता सोसता, किती चटके सोसते’ आई चे असे हे जगणे निरंतर चालूच असते. अगदी आई दुःखालाही चिमटीत पकडते. अशी आई असते.
अगदी मुलगी म्हणते, ‘पप्पा माझ्या आईला बोलू नका, स्त्री जन्म आहे मुका’ माझी आई अंगाई गीत गायची मी झोपावं म्हणून आणि मी जागा राहायचो ते ऐकावं म्हूणन अशा अनेक उदाहरणातून, कवितेतून व्यक्त होणाऱ्या नात्यांचा परामर्श घेतात. अजुन तरी मुलाच्या इस्टेटीत वाटा मागणारा बाप जन्मला आला नाही. प्रेमाचं सुंदर नातं सांगताना ‘त्याला पाऊस आवडत नाही आणि तिला पाऊस आवडतो’ या कवितेतून मांडतात. अशा सर्वच नाती पवार यांना उपस्थितांना समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.हितेंद्र आहेर होते. प्रास्ताविक व परिचय मराठी विभाग प्रमुख प्रा. रवींद्र पगार यांनी केले. तर आभार डॉ.एस.पी.गरुड यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. डी. के. आहेर, डॉ. बी. एस. बनसोडे, प्रा. सी. बी. दाणी, विविध शाखांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकवृंद, सेवकवृंद ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम