सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मविप्र संचलित येथील अभिनव व जनता विद्यालयात कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मनीष बोरसे होते. अध्यक्षांच्या वतीने कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी उपशिक्षक सुरेश आहेर यांनी कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांचे मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वाटचालीमध्ये मोठे योगदान असून, त्यांनी मविप्र समाजाच्या संस्थापक म्हणूनही काम पाहिलेलं आहे. अण्णा साहेबांच्या सन्मानार्थ नाशिक येथील केटीएचएम कॉलेजला त्यांचे नाव देण्यात आले आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या उक्तीप्रमाणे त्यांनी सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दरवाजे खुली व्हावी यासाठी शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांचे कार्य सर्वांच्या नेहमीच स्मरणात राहील असे सांगितले. सूत्रसंचालन सुरेश आहेर यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम