सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील माजी आमदार कै. शांताराम (तात्या) आहेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या व्हा. चेअरमन पदी रवींद्र दादाजी जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघाच्या मावळत्या व्हा. चेअरमन अर्चना आहेर यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी नूतन पदाधिकारीच्या निवडीसाठी देवळा बाजार समितीचे सभापती व संघाचे संचालक योगेश आबा आहेर यांच्या उपस्थित्तीत व चेअरमन संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. २५ रोजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली.
Deola | देवळा तहसील कार्यालयात शेत रस्त्यांच्या प्रश्नांसंदर्भात शेतकऱ्यांसोबत समन्वय बैठक
यावेळी सर्वानुमते नूतन व्हा. चेअरमन पदी रवींद्र दादाजी जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक सर्वश्री डॉ. राजेंद्र ब्राह्मणकार, चिंतामण आहेर, नानाजी आहेर, कैलास देवरे, अमोल आहेर, काशिनाथ पवार, हंसराज जाधव, साहेबराव सोनजे, सुलभा आहेर, सुवर्णा देवरे, चेतन गुंजाळ, विनोद देवरे, सचिन सूर्यवंशी, सचिव गोरख आहेर उपस्थित होते. नूतन व्हा. चेअरमन रवींद्र जाधव यांचे सहकार क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम