सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमीत व बंद झालेले शिव रस्ते, शेत रस्ते, पाणंद, पांदण, शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे पाय मार्ग कालबध्द कार्यक्रमानुसार खुले करण्यासाठी देवळा तहसील कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. यात तहसिल कार्यालयावरील प्रलंबित शेतरस्ता केसेस तातडीने निकाली काढणे, शासन निर्णयाप्रमाणे नकाशावरील शेतरस्त्यांच्या मोजणी व पोलीस संरक्षण फी बंदची अंमलबजावणी करणे, तहसिल कार्यालयात तहसिलदारांसमवेत शेतरस्त्यांसंबंधित विभागांसोबत शेतकऱ्यांची समन्वय बैठक घेऊन शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे याबाबत चर्चा करण्यात येऊन तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन सादर करण्यात आले.
शासन निर्णयाची अंमलबजावणी करत तालुका शेतरस्ता समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्राम शेतरस्ता समितीच्या तातडीने आदेश देण्यात यावेत. तालुक्यातील सर्व वहिवाटीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्याच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्यात. शासन निर्णयाप्रमाणे मोजणी शुल्क व पोलीस संरक्षण फी बंदची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी. शिव पानंद शेतरस्त्यांचे सर्वेक्षण करून नंबरी हटवणाऱ्यांना दंड सुरू करा, तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा. शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करून समृद्ध गावासाठी दर्जेदार शेतरस्ते करावेत, शेतरस्त्याअभावी पडीक राहणाऱ्या शेत जमीन धारकांना विना अट नुकसान भरपाई देण्यात यावी.
Deola | हॉटेल वेलकममध्ये वैश्या व्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या महिलांची सुटका
तसेच शेतीची वाढत चाललेली तुकडेवारी भाऊ हिस्सेदारी, शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरणही परिहार्य बाब झाली आहे. शेतीमाल बाजारात पोहोचवण्याकरीता, पेरणी अंतर्मशागत कापणी मळणी या स्वरूपाची यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी, शेती पुरक व्यवसाय, सर्प दंश वीज पडणे पुर येणे, आग लागणे या स्वरूपाच्या आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके त्याचबरोबर शेतकरी शेतीत वास्तव्यात असून, शेतमाल बाजारपेठेत पोचवण्यासोबतच विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना दळणवळणासाठी बारामाही दर्जेदार शेतरस्त्याची आवश्यकता असुन तहसील प्रशासनाने वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासन निर्णयाची अंबलबाजवणी करत शेतकऱ्यांना न्याय देत दर्जेदार शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत.
महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेत रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वामध्ये राज्यभर चालु असलेल्या महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवलीच्या वतीने करण्यात येते. यानुसार देवळा तालुक्यातील शेतरस्ते खुले करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे (दि.१८) डिसेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार भूमिअभिलेख, पंचायत समिती, पोलीस स्टेशनमध्ये जनजागृती करून प्रलंबित शिवार रस्ते खुले करून द्यावीत, अशा आशयाचे निवेदन सादर दिले. यावेळी नानाजी शिंदे, भिका पवार, दिनकर सूर्यवंशी, साहेबराव खोंडे, बाबुराव जाधव, शिवाजी सोनवणे, सचिन भामरे, विलास पवार आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम