सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | गणेश खेडगाव, (ता. कळवण) येथील सिध्दीविनायक गणपती मंदिरात शनिवारी दि १० ते १२ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मंदिरासाठी देवळा येथील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक राजेंद्र वडनेरे यांनी चार किलो चांदीची सव्वा फुट इतकी गणपती मूर्ती बनवली असून, या मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या निमित्ताने खेडगाव येथे प्रथमच यात्रोत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
Deola | आयोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे
दि १० फेब्रुवारी – सकाळी ८ ते १२ – गणेश याग पूजन,
- ५१ कुंडांची स्थापना,
- ११ चौरंग स्थापून पिठात्मकपूजन,
- संपूर्ण गावात या गणपती मुर्तीची वाजत-गाजत पालखी मिरवणूक,
- सिद्धिविनायक गणपतीच्या महाआरती ने मिरवणुकीची सांगता ,
दि १० फेब्रुवारी – सायंकाळी ६ ते ९ नाटक
- एक झुंज वादळाशी
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असून, याचे औचित्य साधून
शिवराज्याभिषेक सोहळा, - शंभू राजांच्या महापराक्रमाची यशोगाथा,
Rahul Gandhi | नशिक कोर्टाने ठोठावली राहुल गांधींना नोटिस
दि ११ फेब्रुवारी – सकाळी ८ वाजता
- गणेश याग पूजा,
- ५१ कुंडांची स्थापना ११ चौरंग स्थापन,
दि ११ फेब्रुवारी – सायंकाळी ४ वा.
द्वितीयदिन पूजनाची सांगता,
दि ११ फेब्रुवारी – सायंकाळी ६ ते ९
- “गाव तसं चांगलं” तूफान विनोदी नाटक
- धडाकेबाज ३ लावण्या
- १५ विनोदविरांसह लावणी नृत्यांगना चैताली मुंबईकर व हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांचा कार्यक्रम,
दि १२ फेब्रुवारी – सकाळी ८ वा.
- सिद्धिविनायकाच्या महाआरतीने सुरुवात ,
- गणेशयाग ५१ कुंड स्थापना,
- हवन पूजन १००८ अथर्वशीर्ष आवर्तन दुर्वार्चन मोदक युक्त हवन ,
दि १२ फेब्रुवारी – दुपारी ४ वाजता
- लाडक्या गणपतीच्या महाआरतीने तृतीय दीन समाप्त,
दि १२ फेब्रुवारी – सायंकाळी ६ ते ९
- माझ्या महाराष्ट्राची लोकधारा
- मराठी / हिंदी भावगीत/ भक्तिगीते/ चित्रपट गीतांचा सुरेल कार्यक्रम,
Astro Tips | तुमच्या खिशातल्या रूमालासोबत जोडलंय तुमचं नशीब; वाचा सविस्तर
दि १२ फेब्रुवारी – सकाळी ८ वाजता
महाआरती,
दि १२ फेब्रुवारी – दुपारी – ११ वाजता
२१ ब्रम्हवृंद सहाय्याने ५१ यज्ञकुंड हवनाची पूर्णाहुती,
महानैवेद्य आणि महाआरतीने सोहळ्याची सांगता
दि १३ फेब्रुवारी
महाआरती होऊन गणेश भक्तांना महाप्रसादाचे वाटप करून सोहळ्याची सांगता होईल. तरी या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम