सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | ग्रामपंचायत खालप व संघर्ष समाज विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी अगरबत्ती प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन उपसरपंच मुरलीधर अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणात जवळपास 50 महिलांना सुगंधित अगरबत्ती बनविण्या कामी चित्रा पवार यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, कांताबाई पिंपळसे, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र झाल्टे, बचत गटाच्या सीआरपी यांनी योगदान दिले. सूत्रसंचालन व आभार संघर्ष समाज विकास मंडळाचे अध्यक्ष विष्णू शेवाळे यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम