सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | धर्मनाथ बीज निमित्ताने विखाऱ्या पहाड येथे परिसरातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या जागृत अशा श्रीक्षेत्र गोरक्षनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यानिमित्ताने शुक्रवारी (दि. 31) रोजी याठिकाणी पारंपरिक पद्धतीने यात्रा भरली. धर्मनाथ बीजे निमित्ताने याठिकाणी दर्शनासाठी देवळा तालुक्यातील खर्डेसह वाजगाव, वडाळा, कणकापूर, कांचने, शेरी, वार्षि, हनुमंत पाडा, मुलुखवाडी आदी तर चांदवड तालुक्यातील कानमंडाळे, धोडंबे, वडाळीभोई परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. विखाऱ्या पहाडावर असलेल्या जागृत अशा गोरक्षनाथ मंदिरात गुरुवारी (दि.30) रोजी रात्री 9 वाजता नाथ जागरण कार्यक्रम झाला.
तर, शुक्रवारी (दि. 31) रोजी सकाळी 7 वाजता महाआरती, 8 वाजता ध्वजपूजन, 9 वाजता अभिषेक व नंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. धर्मनाथ बीज निमित्ताने ऐतिहासिक धोडप किल्ल्याच्या लागून असलेल्या विखाऱ्या डोंगरावर जागृत गोरक्षनाथ देवस्थान आहे. याठिकाणी नसर्गिक जलस्त्रोत (पाण्याचा टाका) आहे. येथे येणारे भाविक स्नान करतात. या पाण्याने आंघोळ केल्यास धुरर्ध आजरा बरे होतात अशी आख्यायिका आहे. ह्या टाक्यात पाणी बारमाही असते. दरम्यान, या देवस्थानाला पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.
Deola | मकरंदवाडी येथे भव्य धर्मनाथ बीज महोत्सवाचे आयोजन
हा परिसर चांदवड देवळा मतदारसंघात येत असल्याने आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून विखाऱ्या पहाड वरील गोरक्षनाथ मंदिरात तीर्थ क्षेत्र विकास योजनेतून भक्त निवास, नवीन मंदिराचे बांधकाम तसेच सभा मंडपाचे कामकाज झाले आहे. या सुविधेमुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर या मंदिरात जाण्यासाठी खर्डे परिसरातील ग्रामस्थ पाय वाटेचा वापर करतात. तर चांदवड तालुक्यातील धोडंबे गावाकडून मंदिरापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता तयार करण्यात आलेला असून, तो कायमस्वरूपी वापरासाठी काँक्रीटचा पक्का रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणीही भविकांकडून करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम