सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | चनकापूर उजव्या कालव्याला रब्बी हंगामातील आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी नायब तहसीलदार बबन अहिरराव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाचा आशय असा की, चनकापूर धरणाच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण ओहरफ्लो झाले आहे. आता जानेवारी संपत आल्याने विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड झाली असून, गहू, हरबरा आदी रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत.
Deola | देवळा तालुक्यातील झीरेपिंपळ शिवारात बिबट्याचा वावर
यासाठी चनकापूर धरणातून उजव्या कालव्याला आवर्तनाचे पाणी सोडण्यात यावे, यामुळे पिकांना वेळेवर पाणी भरता येईल. याची तहसील व पाटबंधारे विभागाने दखल घेऊन तात्काळ पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना चांदवड देवळा विधानसभा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चव्हाण आदींसह नाजीम ताबोळी, योगेश देवरे, राकेश हेबाडे यांच्या सह्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम