सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मविप्रच्या पिंपळगाव वा. येथील जनता विद्यालयात स्काऊट गाईड अंतर्गत बाल आनंद मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक विजय पगार होते. यावेळी प्राचार्य संगीता आहेर यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. स्काऊट गाईड ध्वजारोहण स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य दौलत वाघ यांच्या हस्ते झाले. शालेय समिती अध्यक्ष नानाजी पाटील व सदस्य, पालक वर्ग व विद्यार्थी या सर्वांचे स्वागत केले. सूत्रसंचालन रवींद्र निकम यांनी केले.
विजय पगार यांनी स्काऊट गाईड अंतर्गत ‘बाल आनंद मेळावा’ हा विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञान दाखविण्यास किती महत्त्वाचा आहे, हे पटवून दिले. स्पर्धेच्या युगामध्ये आपली शाळा कोठेही कमी पडू नये. त्यासाठी शाळेची उपक्रमशीलता समाजापुढे मांडण्यासाठी शिक्षक असे नवनवीन प्रयोग करत असतात. यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, असे सांगितले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष नानाजी पाटील, दौलत वाघ, दीपक थोरात, विजय वाघ, विश्वास पाटील, डॉ. संतोष सोनार व ग्रामस्थ उपस्थित होते.
Nashik News | नाशिकमधील चौकशीत ईडीला यश; कोट्यवधींचे घबाड सापडले
स्काऊट गाईड अंतर्गत मेळावा यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक आर. एच. देसले, चंद्रशेखर चव्हाण, अशोक खैरनार, पवन निकम, महेंद्र बच्छाव, हेमंत पवार, दिनेश जाधव, भूषण बच्छाव, सुनिता आहेर, मंगला आहेर, वैशाली निकम, जयश्री बिरारी, प्रियंका बच्छाव, सरोज जाधव, रोहिणी आहेर, भारती देवरे, प्रभाकर पवार, कैलास हाळदे, सुभाष आहेर, माणिक पवार, गोरख ठाकरे, जालिंदर पानसरे, मोहन बोरसे, सुरेखा आहिरे, आदित्य सोनवणे आदींनी विशेष परिश्रम घेतले. रवींद्र निकम यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम