Deola | मकरंदवाडी येथे गुरुवार पासून धर्मनाथ बीज महोत्सव

0
40
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  मकरंदवाडी (ता.देवळा) येथील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ मळ्यात दि. ८ ते १२ फेब्रुवारी दरम्यान ‘भव्य धर्मनाथ बीज महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती या संस्थानचे संचालक व कीर्तन केसरी संजय धोंडगे यांनी दिली आहे. या निमित्ताने हरिपाठ, कीर्तन सोहळा, बीजउत्सव आदी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बीजउत्सवाचे हे ३० वे वर्ष असून त्या निमित्ताने राज्यातील प्रसिध्द कीर्तनकार पुढीलप्रमाणे आपली सेवा रुजू करणार आहेत.(Deola)

Nashik | पिंपळगाव विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

Deola | अशी आहे कीर्तनसेवा – 

१. दि. ८ फेब्रुवारी – चंद्रशेखर महाराज देगलूरकर

२. दि. ९ फेब्रुवारी – श्री उद्धव महाराज मंडलिक (नेवासा)

३. दि. १० फेब्रुवारी  – श्री विश्वनाथ महाराज वारिंगे (मुंबई)

४. दि. ११ फेब्रुवारी – श्री कान्होबा महाराज देहूकर यांची कीर्तने होणार असून,(Deola)

५. दि. १२ फेब्रुवारी – ह.भ.प संजय महाराज धोंडगे यांच्या काल्याच्या किर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे. दरम्यान, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान ‘धर्मनाथ बीज उत्सवा’निमित्त आचार्य तुषार भोसले यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानाच्या करण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here