सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मविप्र संचलित पिंपळगाव (वा.) येथील जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संगीता आहेर होत्या. व्यासपीठावर प्रभारी पर्यवेक्षक अशोक खैरनार, रवींद्र निकम, वैशाली निकम, चंद्रशेखर चव्हाण, हेमंत पवार, पवन निकम, मंगला आहेर, जयश्री बिरारी, प्रियंका बच्छाव उपस्थित होते. शिक्षक मनोगतात सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख रवींद्र निकम यांनी “देव दगडात नसून माणसात आहे” असे सांगणारे संत गाडगे महाराज यांनी अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेच्या नायनाटासाठी त्यांनी आपले जीवन खर्ची घातले.
अनाथ, अपंगांचे सेवेकरी म्हणून थोर त्यांची ओळख सांगता येईल. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यातील पैशातून अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालय, आश्रम, विद्यालय सुरू केले. अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाचे व दोषांची जाणीव करून देत आपले विचार साध्या-भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा उपयोग करत संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला आहे.
Deola | पिंपळगाव विद्यालयात कर्मवीर अॅड. विठ्ठलराव हांडे यांना अभिवादन
प्राचार्य संगीता आहेर यांनी स्वच्छता अभियानाचे जनक, समाज सुधारण्यासाठी, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी, सार्वत्रिक स्वच्छतेसाठी तसेच बहुसंख्य बहुजन, मागासलेला वर्ग शिक्षण घेऊन साक्षर ज्ञानसंपन्न व्हावा, अस्पृश्यता, जातीभेद यांचे निर्मूलन, उच्चाटन व्हावे म्हणून संपूर्ण आयुष्य त्यासाठी व्यतीत करणारे असे कृतिशील समाज सुधारक, समाज प्रबोधक व साध्या रहाणीचा अंगीकार करणारे निरपेक्ष, निस्वार्थी असे थोर राष्ट्रसंत संत गाडगे महाराज यांची तुलना होणे अशक्यच असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन सरोज जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन पृथ्वीराज सूर्यवंशी यांनी मानले. या कार्यक्रमाचे फलक रेखाटन कला शिक्षिका रोहिणी आहेर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम