Deola | झिरेपिंपळ शिवारात बिबट्याचा संचार; परिसरात भीतीचे वातावरण

0
8
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा विठेवाडी रस्त्यावर झिरेपिंपळ शिवारात गुरुवारी (दि.१९) रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास डाळींबाच्या शेतात बिबिट्या शिरल्याने बागेत व आजूबाजूला कांदे लागवड करणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन बागेत सायरनचा वापर करून बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र याठिकाणी बिबट्या आढळून न आल्याने कर्मचाऱ्यांना माघारी फिरावे लागले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, गुरुवारी (दि.१९) रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास देवळा विठेवाडी रस्त्यावर झिरेपिंपळ शिवारात देवळा येथील सतीश आहेर यांचे डाळींबाचे क्षेत्र असून, नवीन बागेत लावण्यात आलेल्या दुहेरी कांदा पिकाची मजूर काढणी करत असताना त्यांना बागेत बिबट्या शिरल्याचे दिसून आले. तसेच आहेर यांच्या शेतालगत असलेल्या आजुबाच्या क्षेत्रावर कांदा लागवड करणाऱ्या मजुरांनाही शेजारील बागेत बिबट्या शिरल्याचे समजताच मजुरांसह सर्वच भयभीत झाल्याने खळबळ उडाली. अखेर याची वनविभाला माहिती दिल्यानंतर लागलीच वनपाल प्रसाद पाटील व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला शोधण्यासाठी बागेसह आजूबाजूचा परिसर पिंजून काढला.

Deola | गुंजाळनगर येथे ठेवीदारांनी पतसंस्थेच्या अध्यक्षांसह सहकार अधिकाऱ्याला ठेवले डांबून

शेतात वन्य प्राण्याच्या पायांचे ठसे आढळून आले. मात्र हे ठसे बिबट्याचे नसून तरस प्राण्याचे असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले. तसेच सायरनचा माध्यमातून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्या किंवा तरस आढळून आला नसल्याने त्यांनी काढता पाय घेतला. याठिकाणी प्रथमदर्शनीच्या म्हणण्यानुसार आम्हाला बिबट्याच दिसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या तालुक्यात सर्वत्र कांदे लागवड जोरात सुरु असून, शेतकरी, मजूर रात्री कांद्यांना पाणी भरतात. त्यामुळे या भागात पिंजरा बसविण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here