Deola | गुंजाळनगर येथे ठेवीदारांनी पतसंस्थेच्या अध्यक्षांसह सहकार अधिकाऱ्याला ठेवले डांबून

0
6
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  येथील जनुभाऊ आहेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, गुंजाळनगर या पतसंस्थेच्या ठेवीदारांनी गुरुवार (दि.१९) रोजी संस्थापक अध्यक्षांसह सहकार अधिकाऱ्याला संस्था कार्यालयात डांबून ठेवले. सायंकाळी उशिरा साडे सहा वाजता सहकार अधिकारी वसंत गवळी यांनी वसुली करून तुमचे पैसे परत केले जातील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर सोडून देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी कि, देवळा येथे जनुभाऊ आहेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, गुंजाळनगर या संस्थेची सन १९९४ रोजी स्थापना झाली असून, या संस्थेत अनेक ठेवीदारांनी आपले पैसे गुंतवले आहेत. मात्र कर्ज वसुली अभावी हि संस्था अवसायनात निघाल्याने ती गेल्या बारा वर्षांपासून बंद असल्याने ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत.

Deola | देवळा येथील तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना शिवीगाळ

संबंधित ठेवीदारांनी सहकार विभागाकडे आमच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी पाठपुरावा केल्यानंतरही अद्याप त्यांना आपल्या कष्टाचे व हक्काचे पैसे परत मिळत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आज गुरुवार (दि.१९) रोजी सहकार अधिकरी वसंत गवळी व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय आहेर हे दुपारी तीन वाजेच्या सुमारास संस्था कार्यालयात आले असता संतप्त ठेवीदारांनी त्यांना कार्यालयात डांबून ठेवत बाहेरून शेटरला कुलूप लावून घेतले. तब्बल अडीच तासानंतर सहकार अधिकारी वसंत गवळी यांनी ठेवीदारांना वसुली करून आपले पैसे लवकरात लवकर देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर कार्यालयाचे कुलूप उघडून त्यांना बाहेर काढण्यात आले. यावेळी ठेवीदार देवाजी निकम, सोमनाथ वराडे, महेंद्र आहेर आदींसह सचिव शरद आहेर, पुंडलिक आहेर, विजय शिंदे, डॉ. राजेंद्र गुंजाळ आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here