सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा नाशिक रस्त्यावर रामेश्वर फाटा येथे रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास चारा जळून खाक झाला. घटनास्थळी देवळा अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहचल्यानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळा नाशिक रस्त्यावर असलेल्या रामेश्वर फाटा येथे प्रगतीशील शेतकरी वसंत केदा गुंजाळ रा. गुंजाळनगर यांनी आपल्या शेतात गुरांसाठी जवळपास आठ एकर क्षेत्रावरील मक्याचा चारा वळई करून रचून ठेवला होता.
Deola | रोटरी क्लबच्या उपप्रांतपाल पदी अरुण पवार यांची निवड
रविवारी दि.15 रोजी रात्री 9 सुमारास विजेच्या शॉट सर्किटमुळे ह्या चाऱ्याला आग लागली. या घटनेची खबर शेतकरी गुंजाळ यांनी देवळा नगर पंचायतीच्या अग्निशमन विभागाला दिल्यानंतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली. यात जवळपास 75 टक्के चारा जळून खाक झाल्याची माहिती वसंत गुंजाळ यांनी दिली. या कामी अग्निशमन दलाचे कर्मचारी राजु शिलावट, रवि आहिरे आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी परीश्रम घेतले. सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. याची नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी वसंत गुंजाळ गुंजाळ यांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम