सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | रोटरी क्लबच्या उपप्रांतपाल पदी वडाळा ता. देवळा येथील उद्योजक अरुण गोविंद पवार यांची नियुक्ती करण्यात आली. भऊर येथील स्वप्निल अॅग्रो अॅण्ड फीड मिलचे संचालक अरुण पवार हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. देवळा रोटरीचे ते माजी अध्यक्ष असून, ह्या क्लबने २४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या रोटरी क्लबने स्वतःची एक ओळख निर्माण केली असून, या कामाची दखल घेत पवार यांची उप प्रांतपाल पदी नियुक्ती करण्यात आली.
Deola | विठेवाडी येथे शेतकरी संघटनेचे संस्थापक कै. शरद जोशी यांची नववी पुण्यतिथी साजरा
त्यांच्या निवडीचे देवळा रोटरी क्लबचे अध्यक्ष राकेश शिंदे, सचिव सुनिल आहेर, डॉ. व्ही. एम निकम, हितेंद्र आहेर, डॉ. वसंतराव आहेर, कौतिक पवार, प्रितेश ठक्कर, सतिश बच्छाव, एस. टी पाटील, दिनेश देवरे, अरुण डी. पवार, संजीव आहेर, कैलास बागुल, संदीप पगार, सुनिल देवरे, विलास सोनजे, भारत गोसावी, अब्रार मणियार, कैलास बागुल, सुनिल जाधव, रोशन अलीटकर, खंडू मोरे, अॅड. रितेश निकम, सौरभ चव्हाण, भगवान आहेर, अक्षय सोनवणे, मनोज पवार आदींनी अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम