Deola | मेतकर पतसंस्थेच्या वतीने सभासदांना ९% लाभांश – चेअरमन सुरेश नेरकर

0
21
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील मधुकर पांडुरंग मेतकर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना यावर्षी ९ % लाभांश देण्यात येणार असून, थकबाकीदार सभासदांनी आपल्याकडील कर्ज वेळेत भरून कायदेशीर कारवाई टाळावी व संस्थेच्या वतीने कर्ज वसुलीसाठी कडक धोरण अवलंबिले जात जाणार असल्याची माहिती चेअरमन सुरेश नेरकर यांनी दिली. या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि.१३) रोजी खेळीमेळीच्या वातावरण पार पडली. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी सभासद पाल्यांच्या व विविध क्षेत्रात निवड झालेल्या सभासद व हितचिंतकांचा सत्कार करण्यात आला.

Deola | तिसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सुलोचना जाधव यांची बिनविरोध निवड

सभेत पवन अहिरराव, अनिल आहेर, धनंजय आहेर, विजय मेतकर, रामकृष्ण दशपुते यांनी चर्चेत भाग घेतला होता. यावेळी चेअरमन सुरेश नेरकर,व्हा चेअरमन केतन लुंकड, मानद कार्यकारी संचालिका माधुरी मेतकर, अजय मेतकर, संतोष शिंदे, विष्णू जाधव, जकीर शेख, तेजस मेतकर, नितीन आहेर, नानाजी चंदन, गिरीश कचवे, शुभांगी मेतकर आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहवाल वाचन व्यवस्थापक संदीप देवरे यांनी केले तर माजी चेअरमन दिलीप मेतकर यांनी आभार मानले. सभा यशस्वीतेसाठी रोखपाल भूषण शिरसाट, सचिव ज्ञानेश्वर मेतकर, वैभव देवरे, अनिल मेतकर, संदीप भामरे, योगेश शिरसाट यांनी विशेष परिश्रम घेतले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here