Deola | देवळ्यात अपुऱ्या बसेसमुळे प्रवाशांना मनस्ताप; शटल बस फेरी सुरू करण्याची मागणी

0
19
Deola
Deola

Deola | देवळा तालुक्यातील अतिदुर्गम अशा पश्चिम भागातील खर्डे परिसरासाठी शटल बस सेवा करावी. तसेच मुक्कामी हनुमंतपाडा बस नियमित वेळेत सुरू ठेवावी या मागणीचे खासदार भास्कर भगरे यांनी दिलेले पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळा शहर प्रमुख दिलीप पाटील यांनी शुक्रवारी दि.१३ रोजी सटाणा आगार प्रमुखांना दिले. देवळा तालुक्यातील जनतेला नेहमीच एसटी बसच्या सततच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पश्चिम भागात बसेस वेळेवर धावत नसल्याने देवळा येथे जाणाऱ्या शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते.

Deola | मेतकर पतसंस्थेच्या वतीने सभासदांना ९% लाभांश – चेअरमन सुरेश नेरकर

या मार्गावर सुरू असलेली सटाणा हनुमंतपाडा ही मुक्कामी बस वेळेत येत नाही. अपुऱ्या बसेसमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच चांदवड येथे तालुक्यातुन उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चांदवड येथून वेळेत बस मिळत नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच खर्डे मार्गावर शटल बस फेरी सुरू करावी, अशी मागणी सदर पत्रकात केली आहे. यावेळी प्राचार्य हितेंद्र आहेर, डॉ. व्ही.एम निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप पाटील, शरद आहेर, सुभाष आहेर, धनंजय आहेर, शंकर आहेर, रवींद्र आहेर, भाऊसाहेब देवरे, जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी आदी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here