सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | जि.प.च्या सेस योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटेव्हेटर, कडबाकुट्टी यंत्र व विद्युत पंप या अनुदानावर देण्यात येणाऱ्या साहित्याचा येथे गुरुवारी दि.५ रोजी लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. पंचायत समिती स्तरावर या योजनेतून साहित्य वाटपासाठी लाभार्थी शेतकरी निवडीसाठी दि.१ ते दि.३० ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जाची ३१ ऑगस्ट रोजी छाननी करण्यात येऊन लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आणि गुरुवारी दि.५ रोजी देवळा पंचायत समितीच्या आवारात लॉटरी पद्धतीने प्राधान्यक्रम ठरविण्यात आले.
Deola | वसाका विक्री न करता भाडेतत्त्वावर सुरू करण्याचा राज्य सहकारी बँकेचा निर्णय
यात ट्रॅक्टरसाठी एकूण ३५ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी एससी साठी १, ओपन साठी ४, तर रोटेव्हेटरसाठी २८ अर्ज प्राप्त झाले असून, यापैकी एससी साठी १, ओपन साठी ४ अशा एकूण प्रत्येकी ५ लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. तर कडबाकुट्टी यंत्रासाठी २१ अर्ज प्राप्त झाले असून यात एससी साठी २, ओपन साठी ६ अशा ८ लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. विद्युत पंपासाठी १७ अर्ज प्राप्त झाले होते. यात एससी साठी २, ओपन साठी ६ अशा ८ लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. यावेळी प्रत्येक साहित्यासाठी लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठीद्वारे लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी भरत वेन्दे, कृषी विस्तार अधिकारी सचिन थैल, नलिनी खैरनार आदींसह लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम