सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा तालुक्यातील लोहणेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उषाबाई गुलाब सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लोहणेर (ता.देवळा) येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाऊसिंग गायकवाड यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच निंबा धामणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.२७) रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत सभागृहात ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलविण्यात आली.
Deola | बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर देवळा येथे मुख्याध्यापकांची कार्यशाळा
यावेळी ग्रामविकास अधिकारी संदिप खेबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच पदाकरिता निर्धारित वेळेत उषाबाई सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सरपंच निंबा धामणे, मावळते उपसरपंच भाऊसिंग गायकवाड, सदस्य रेश्मा महाजन, विमल शेवाळे, दिपक बच्छाव, मोहिनी आहेर, धोंडू आहिरे, चंद्रकांत शेवाळे, सतिष सोमवंशी, प्रसाद देशमुख, राकेश गुळेचा आदिंसह आजी-माजी पदाधिकारी आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“गावाचा विकास हेच प्रमुख ध्येय समोर ठेऊन, सर्वांना बरोबर घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहणार”
– (उषाबाई सोनवणे, उपसरपंच)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम