Deola | श्रीक्षेत्र खर्डे ते त्रंबकेश्वर पायी दिंडीचे प्रस्थान

0
48
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  श्रीक्षेत्र खर्डे ते त्रंबकेश्वर पायी दिंडीचे हे ३४ वे वर्ष असून, या पायी दिंडीचे खर्डे (ता. देवळा) येथून बुधवार (दि. ३१) रोजी प्रस्थान झाले. दिंडीत सामील झालेल्या भाविक भक्तांना यावेळी गावकऱ्यांनी भक्तिमय वातावरणात निरोप देऊन दिंडी मार्गस्थ झाली.Deola)

या पायी दिंडीचा खर्डे, धोडंबा, गोहरण, वडनेर भैरव, पिंपळगाव बसवंत, कोकणगाव, ओझर, आडगाव, नाशिक, सातपूर, पिंपळगाव बहुला, महिरावणी व त्रंबकेश्वर असा मार्गक्रम असणार असून भाविकांना ठिकठिकाणी सकाळी, दुपारी, सायंकाळी, रात्री चहा नाश्ता, जेवणाची व्यवस्था संबंधित दानशूरांकडून करण्यात आली आहे. दिंडीत मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष, अबाल वृद्धांचाही यात समावेश आहे.

Nashik | नाशिकमध्ये ‘ईडीअस्त्र’ बरसले; मोठे व्यावसायिक रडारवर

खर्डे येथे सकाळी देविदास अलई, कृष्णा जाधव यांच्या कडून नाश्ता, चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मुक्कामाच्या ठिकाणी रोज भजन, कीर्तन होईल. मंगळवारी (दि. ६) रोजी त्रंबकेश्वर येथील यात्रेनिमित्त भाविक संत निवृत्तीनाथ महाराजांचे दर्शन घेतील व बुधवार (दि. ७) रोजी सकाळी ९ वाजता ह. भ. प. पुंडलिक महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाल्यावर भाविकांना महाप्रसाद वाटप करून दिंडी परतीच्या प्रवासाला निघेल.(Deola)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here