सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा उपविभागातील ५० वर्ष जुने ३३/११ के.व्ही. देवळा उपकेंद्राला ISO 9001:2015 नामांकन प्राप्त झाले. या निमित्ताने आयोजित अधिकारी-कर्मचारी कौतुक सोहळ्यात प्रमुख पाहुणे अधीक्षक अभियंता जगदीश इंगळे मालेगाव यांनी देवळा उपविभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी गेली सहा महिने दैनंदिन कामकाजात वेळ काढून नामांकन प्राप्त करण्यासाठी जी अहोरात्र मेहनत घेतली, त्याचे हे फलित असल्याचे सांगितले.
तसेच देवळा उपकेंद्र हे मालेगाव मंडळातील सर्वात जुने म्हणजे ५० वर्ष पूर्वीचे असून अतिशय गुंतागुंतीचे होते. कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून ISO नामांकन प्राप्तीसाठी ज्या आवश्यक पूर्तता करावी लागते ती करण्यात यशस्वी झाले. उपकेंद्राची पाहणी केली असता परिसर स्वच्छता, नीटनेटकेपणा, विद्युत प्रणालीची सुसूत्रता जेणे करून ग्राहकास अखंडित, दर्जेदार विद्युत पुरवठा होऊन महावितरणच्या लौकिकात मनाचा तुरा रोवण्यात येथील अधिकारी व कर्मचारी पात्र झालेत. भविष्यात देखील हा लौकिक टिकवून ठेवतील ही अपेक्षा व्यक्त केली.
Deola | महावितरण अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने देवळा उपकेंद्रात राबवली स्वच्छता मोहीम
या प्रसंगी मालेगाव मंडळातील कार्यकारी अभियंता (प्रशासन) शैलेश जैन यांनी देवळा उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सांघिक कार्यामुळे हे सर्व शक्य झाले असून थकबाकी वसुली हे सर्व कामे करीत असताना ग्राहकसेवा, महावितरण चे मुख्य कार्यालय यांना अपेक्षित असणारे सर्व मापदंड या बाबतीत हा उपविभाग नेहमी अव्वल दर्जाचा राहिला आहे. कळवण विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज पाटील यांनी कर्मचारी वर्गाचे विशेष कौतुक करून कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनाचा वापर करून विद्युत अपघात होणार नाही. याची काळजी घ्यावी असे सांगितले.
उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे, नितीन अम्बाडकर, लक्ष्मीकांत चव्हाण, यंत्रचालक बाळा देवरे, तुषार सोनवणे, निखील थोरात, जनमित्र गुलाब आहेर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सहाय्यक अभियंता जितेंद्र देवरे यांनी केले. सूत्रसंचालन कैलास शिवदे यांनी तर आभार यंत्रचालक हिरामण पवार यांनी मानले. कार्यक्रमास अतिरिक्त कार्यकारी अभियंता थैल, सहाय्यक अभियंता घनश्याम कुंभार, कल्याणी भोये, गौरव पगार, उपव्यवस्थापक (लेखा) अविनाश डमरे, स्वाती शिंदे–देवरे, विद्युत ठेकेदार सतीश बच्छाव आदींसह यंत्रचालक, जनमित्र, सुरक्षा रक्षक कर्मचारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम