सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | महावितरण देवळा उपविभागातील ३३/११ केव्ही उपकेंद्र येथे गेल्या सहा महिन्यापासून अधिकारी व कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नातून देवळा उपकेंद्र ISO ९००१:२०१५ प्रमाणित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. याच प्रयत्नाच्या अनुषंगाने मालेगाव मंडळमधील सर्वात जुने व मोठे उपकेंद्र असून बरेच जुने व मोठे साहित्य आवारात पडून होते. येथील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदानातून आज मंगळवारी (दि. ९) रोजी सकाळपासून स्वच्छता मोहीम राबवली.
Deola | कनकापुर-शेरी मार्गे बस सुरू झाल्याने ग्रामस्थांकडून चालक, वाहक यांचा सत्कार
मालेगाव मंडळ मधील सर्व प्रथम ISO ९००१:२०१५ प्रमाणित देवळा उपविभागातील दहीवड उपकेंद्रास मानांकन मिळाले. त्याची प्रेरणा घेऊन उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वात जुने व अतिशय गुंतागुंतीचे देवळा उपकेंद्र ISO मानांकन घेण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रयत्नशील आहेत. ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व वेळेवर सेवा देण्यासाठी देवळा उपविभाग अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहे. सर्वांच्या सहकार्याने ही सांघिक जबाबदारी पार पाडतील अशी अपेक्षा देवळा उपविभाग उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे, उपकेंद्र प्रमुख जितेंद्र देवरे यांनी व्यक्त केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम