सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | कनकापुर, कांचने व शेरी ग्रामपंचायतीच्या एकत्रित पाठपुराव्याने हनुमंतपाडा मुक्कामी बस सेवा कनकापुर-शेरी मार्गे सुरू झाल्याने या भागातील नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सटाणा आगाराची सटाणा-हनुमंतपाडा ही बस पूर्ववत सुरू झाली असली तर या परिसरातील लगतची असलेली कनकापूर, कांचने आणि शेरी ह्या गावातील नागरिक व विद्यार्थी ह्या बस सेवेपासून वंचित होते.
Deola | विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील सेतू संचालकांची ‘बंद’ची हाक
यामुळे जास्त करून खर्डे व देवळा येथे माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे लक्षात घेऊन कणकापूर व शेरी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सटाणा आगार प्रमुख अहिरे यांची भेट घेऊन या मार्गावरून हनुमंतपाडा मुक्कामी बस सुरू करावी अशी मागणी केली. याची तात्काळ दखल घेत कनकापूर, शेरी मार्गावर सकाळ व संध्याकाळच्या वेळी बस सुरू झाली असून, येथील ग्रामस्थांनी चालक, वाहक यांचा सत्कार करून आभार मानले. गैरसोय दूर झाल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी कनकापूरचे उपसरपंच जगदीश शिंदे, सदस्य गोविंद बर्वे, नितीन शिंदे, शेरीचे चंद्रकांत पवार, ठाकरे गटाचे खर्डे गटप्रमुख गोरख गांगुर्डे, भास्कर पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम