सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान महाराष्ट्र, पुणे या नोंदणीकृत, स्वयंसेवी संस्थेच्या वतीने वडाळा ता. देवळा येथील स्वप्निल ऍग्रोचे संचालक वैभव पवार यांना नुकताच पुणे येथे राज्यस्तरीय उत्कृष्ट कुक्कुटपालक व्यावसायिक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील पशुसंवर्धन क्षेत्रातील सेवानिवृत पशुवैद्यांनी एकत्र येऊन ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान महाराष्ट्र, पुणे या संस्थेची नोंदणी केली आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातील पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पशुवैद्य, पशुपालक, कुक्कुटपालक, अध्यापक, पशुवैद्य, शेळीपालक, उत्कृष्ठ मेषपालक आदींना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तसेच पशुसंवर्धन क्षेत्रात काम केलेल्या संस्था व व्यक्तींना “जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात येतो.
Deola | विद्यार्थ्यांना गाडीतून मिरवत मेशी येथे शाळा प्रवेशोत्सव..
संस्थेच्या वतीने “वेंकटेश्वरा हॅचरीज समूहाततील उत्कृष्ट कुक्कुटपालक व्यावसायिक पुरस्कार वडाळा येथील स्वप्निल ऍग्रोचे संचालक वैभव पवार यांना आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर,संस्थेचे अध्यक्ष डॉ. र. त्रिं. वझरकर, संस्थेचे सचिव डॉ. सुनिल राऊतमारे, डॉ. श्याम कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ. विवेक क्षिरसागर, कोशाध्यक्ष डॉ. ध. मो. चव्हाण व कार्यकारणीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. वैभव पवार यांना राज्यस्तरीय आदर्श कुक्कुटपालक व्यावसायिक पुरस्कार मिळाल्याबद्दल वेंकटेश्वरा हॅचरीज समूहाच्या वतीने डॉ पेडगावंकर व डॉ मोधे यांसह कुक्कुटपालन व्यवसायिक संघटना महाराष्ट्र राज्य व नासिक जिल्ह्यातील कुक्कुटपालक व्यावसायिक आदी संस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Deola | धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम