Deola | विद्यार्थ्यांना गाडीतून मिरवत मेशी येथे शाळा प्रवेशोत्सव..

0
13
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  तालुक्यातील मेशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी गावातून सनरूफ कारमधून शिक्षण रथाची मिरवणूक काढत पहिलीच्या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले. चिमुकल्यांच्या स्वागतासाठी फुगे, कार्टून चित्रे, प्राण्यांचे मुखवटे, फुले, रंगीत रांगोळी, तोरणे, पताका, झिरमिळ्यांच्या सजावटीने शाळा आणि शिक्षकवृंद सज्ज होते. गावातील नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून सजविलेल्या गाडीतून मिरवणूक काढण्यात आली.

Deola | धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आषिमा मित्तल यांच्या आदेशाने शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्यक्ष भेट देण्यासाठी बालविकास प्रकल्प पर्यवेक्षिका श्रीमती ए. आर. वाघ यांच्या विशेष उपस्थितीत शाळा प्रवेश उत्सव संपन्न झाला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश लांडगे, मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा पाटील, आधार पानसरे, सरला अहिरे, लता मोरकर आणि स्वप्नील पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. श्रीमती वाघ हस्ते नवीन पाठ्यपुस्तकांचे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.

Deola | देवळा येथील क्रीडा मार्गदर्शक सुनिल देवरे यांना राष्ट्रीय योगवीर पुरस्कार जाहीर


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here