Deola | विठेवाडी शिवारात शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे बिबट्या पकडण्यात यश

0
16
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील झिरेपिंपळ (विठेवाडी) शिवारात रविवारी (दि. ३०) रोजी रात्री साडे अकरा वाजता बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले. याबाबत अधिक माहिती अशी की, देवळा तालुक्यातील झिरेपिंपळ (विठेवाडी) शिवारात रविवारी दि. ३० रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास शेतकरी संतोष भाऊराव आहेर यांच्या शेतात घरालगत असलेल्या कोंबडी खुराड्यात अचानक बिबट्या शिरला. यामुळे खुराड्यात असलेल्या कोंबड्यांच्या आवाजाने शेतकरी संतोष आहेर यांनी घराबाहेर येऊन बघितले असता कोंबडी खुराड्यात बिबट्या शिरल्याचे दिसताच त्यांनी आजूबाजूच्या रहिवाशांना याची कल्पना दिल्यानंतर घटनास्थळी काही नागरिक जमा झाले.

Deola | कनकापूर कांचने येथील राखीव गायरानला अज्ञात समाज कंटकाने लावली आग

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांना हा घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांचे पथक पिंजऱ्यासह याठिकाणी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्नानंतर व स्थानिक नागरिकांच्या मदतीने अखेर बिबट्याला पिंजऱ्यात कैद केले. शेतकरी आहेर यांनी बनविलेला कोंबडी खुरड्याचा दरवाजा बरदानच्या सहाय्याने बंद केल्याचे समजते यामुळे बिबट्याला खुराड्यात प्रवेश करणे शक्य झाले. बिबट्या आतमध्ये असताना आहेर यांनी शिताफीने त्याचा दरवाजा बंद केल्यामुळे वन विभागाला सदर बिबट्या पिंजऱ्यात अडकवताना सोपे झाले. या परिसरात बिबट्यांचा वावर आहे. यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here