Deola | देवळा-भावडबारी राज्यमार्गाचे काम दीड वर्षांपासून रखडलेलेच; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

0
8
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा ते भावडबारी या राज्यमार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनधारकांसह रस्त्याच्या आजूबाजुच्या व्यावसायिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याची लोकप्रतिनिधींनी तात्काळ दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत. अपूर्ण कामाअभावी नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. देवळा ते भावडबारी या राज्य मार्गाच्या काँक्रीटीकरण कामाला सुरुवात होऊन जवळपास दीड वर्ष होत आले असून, ते अद्याप पूर्णत्वास आले नाही. रस्त्याच्या कडेच्या शेतकऱ्यांनी त्यांना मोबदला मिळाला नाही म्हणून विरोध दर्शविला असून, त्यांनी मध्यंतरी काम बंद पाडले होते. या काळात रास्ता रोको आंदोलनही झाले.

Jilha Parishad | देवळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इच्छुकांचे ‘गुढग्याला बाशिंग’

मध्यंतरी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्यात आले होते. ठिकाणी ठिकाणी काम अर्धवट पडले आहे. काही जागेवर एकेरी वाहतूक सुरू असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून, गुंजाळनगर ते ओमनगर (देवळा) पर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा संभ्रम वाहनधारकांना पडला आहे. तसेच रत्यावर मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने व्यावसायिक तसेच वाहनधारकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याठिकाणी रस्त्यावर दुकानदार धूळ उडू नये म्हणून स्वतः पाणी मारताना दिसत आहेत. रस्ता पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराने रस्त्यावर पाणी मारावे अशी मागणी सुनील (सुभाष) कृष्णा आहेर यांनी केली आहे. तसेच रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी जोर धरू पहात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here