सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मविप्र संचलित येथील जनता विद्यालयाच्या शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेसाठी विद्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मनीष बोरसे होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. यावेळी तृप्ती निकम, जान्हवी जाधव, राशी जाधव, ओम शिंदे, राशी शेळके आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत विद्यालयात मिळालेल्या अनुभवांचे कथन करत शाळा व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
Jilha Parishad | देवळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इच्छुकांचे ‘गुढग्याला बाशिंग’
शिक्षकांच्या वतीने पुनम पाटील, ज्ञानेश्वर आहेर, सुरेश आहेर, महेश सूर्यवंशी, गणेश निकम, विशाल शेवाळे, विनोद शेवाळे, कैलास पगार, निवृत्ती रौंदळ, राकेश बिरारी आदीं शिक्षकांनी मनोगत व्यक्त करत शालांत परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी, परीक्षेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक मनीष बोरसे यांनी दहावी नंतरच्या वाटा, विद्यार्थ्यांनी आपली रुची ओळखून पुढील शिक्षण घ्यावे असे आवाहन याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे नियोजन वर्गशिक्षक महेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. सूत्रसंचालन मनस्वी पवार व प्रणिती साबळे यांनी केले तर ओम शिंदे यांने आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम