Deola | खारीपाडा येथे वनविभागाच्या आरक्षित क्षेत्रावर शॉट सर्किटमुळे भीषण आग

0
4
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील खारीपाडा (महात्मा फुलेनगर) येथे वनविभागाच्या आरक्षित क्षेत्रावर दुपारी १२ वाजता शॉट सर्किटमुळे आग लागली. देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन दल तसेच स्थानिक नागरिकांच्या अथक प्रयत्नाने दुपारी ४ वाजता आग आटोक्यात आली. याबाबत मिळालेली माहिती अशी कि, देवळा तालूक्यात खारीपाडा (महात्मा फुलेनगर) येथे वनविभागाचे मोठ्या प्रमाणावर आरक्षित जंगल क्षेत्र असून, याला शुक्रवारी दि.७ रोजी दुपारी १२ वाजता शॉट सर्किटमुळे आग लागली. कडक ऊन असल्याने या आगीने रौद्ररूप धारण केले. वेळीच वनरक्षक यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांना घटनेची माहिती दिल्यावर लागलीच घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले.

Deola | शेरी येथे शाळकरी मुलीला पैशाचे आमिष दाखवत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न

तसेच आग विझविण्यासाठी देवळा नागरपंचायतीच्या अग्निशमन पथकाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आल्यानंतर सदर कर्मचारी व स्थानिक सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून दुपारी ४ वाजता आग आटोक्यात आणली. या घटनेत जंगल क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर असलेले वनरोपण, गवत नष्ट झाल्याचे समजते. तसेच पशुपक्षी देखील मृत झाल्याचे सांगितले गेले. आग आटोक्यात आणण्याकामी देवळा नागरपंचायतीच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी दिपक सूर्यवंशी, रवींद्र चव्हाण, समाधान वाघ तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल देविदास चौधरी, वनरक्षक भूपेंद्र राठोड, विजय पगार, नामदेव ठाकरे, वनसेवक ताराचंद देवरे, दादा खैरनार, ईश्वर ठाकरे व स्थानिक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here