Deola | रामराव आहेर नागरी पतसंस्थेला ३४ लाख रुपयांचा नफा – चेअरमन विनोद शिंदे

0
4
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |   येथील श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेस ३१ मार्च अखेर निव्वळ नफा ३४ लाख २४ हजार १५५ रुपये इतका झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन विनोद बाजीराव शिंदे यांनी दिली. याबाबत संस्थेच्या सांपत्तिक स्थितीबाबत सविस्तर माहिती देतांना शिंदे यांनी सांगितले की, संस्थेचे एकूण १ हजार ८७१ सभासद असून, अधिकृत भागभांडवल १ कोटी ८० लाख आहे. वसूल भागभांडवल १ कोटी ७२ लाख २ हजार ८००, निधी ३ कोटी ७६ लाख १४ हजार ५९९, एकूण ठेवी १२ कोटी १७ लाख ८२ हजार ५४२, कर्जवाटप ८ कोटी ६५ लाख ९३ हजार ४७८, गुंतवणूक ९ कोटी ६६ लाख ३५ हजार ५७८, खेळते भागभांडवल १९ कोटी ९० लाख १३ हजार ६४६, सीडी रेशो ५५.८७, थकबाकी १३ % याप्रमाणे आहे. यावेळी व्हा. चेअरमन दीप्ती आहेर, संचालक सर्वश्री डॉ. वसंतराव आहेर, सुभाष आहेर, अरुण खरोटे, रजत आहेर, सतीश राणे, डॉ. अविनाश आहेर, दुलाजी आहेर, पंकज आहेर, विठ्ठल गुजरे, पंडित चंदन, वंदना आहेर आदींसह व्यवस्थापक रविंद्र देवरे, राजेंद्र वनजी देवरे, अरुण जाधव, ज्ञानेश्वर मेतकर, रितेश शिंदे, शंकर नवरे उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here