सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी पवन अंबादास अहिरराव यांची तर व्हा. चेअरमन पदी प्रवीण काशिनाथ अलई यांची नियुक्ती करण्यात आली. या संस्थेची १७ मार्च रोजी संचालक मंडळाची निवडणूक झाली. मंगळवारी (दि. ८) रोजी संस्थेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी दुपारी २ वाजता संस्था कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली. यावेळी निर्धारित वेळेत चेअरमन पदासाठी पवन अहिरराव व व्हा. चेअरमन पदासाठी प्रवीण अलई यांचे निर्धारित वेळेत अर्ज प्राप्त झाल्याने यावेळी त्यांची नियुक्तीची घोषणा करण्यात आली. यावेळी संचालक नितीन शेवाळकर, दत्तात्रय देवरे, धनंजय आहेर, पंकज निकम, विजय आहेर, निखिल आहेर, योगेश शेवाळे, वंदना आहेर, सुषमा खरोटे, धनंजय राजवाडे, व्यवस्थापक हेमंत गोसावी, अनंत अलई, सुदर्शन निर्वाण आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम