Deola | श्रीमान दोस्ती नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी देविदास हिरे यांची बिनविरोध निवड

0
6
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील श्रीमान दोस्ती नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी देविदास कौतिक हिरे यांची तर व्हा. चेअरमन पदी ताकदिर भाऊराव कापडणीस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पतसंस्थेची देवळा शहरात १९ आक्टोबर २०२३ रोजी स्थापना झाली असून, अल्पावधीत संस्थेने प्रगतिकडे वाटचाल सुरु केली. मावळत्या पदाधिकाऱ्यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी मंगळवारी (दि. ८) रोजी सहकार अधीकारी ज्ञानेश्वर आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. यात सर्वानुमते चेअरमन पदी देविदास कौतिक हिरे यांची तर व्हा. चेअरमन पदी ताकदिर भाऊराव कापडणीस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संचालक बापू जाधव, निलेशकुमार गुंजाळ, शामकांत आहेर, किरण आहेर, सिताराम सूर्यवंशी, विलास माळी, भरत आढाव, सुवर्णा आहेर, अनिता देसले, दशरथ पूरकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here