सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील मधूकर पांडूरंग मेतकर पतसंस्थेला ३१ मार्च अखेर २७ लाख १५ हजार रूपयांचा नफा झाल्याची माहिती चेअरमन सुरेश नेरकर यांनी दिली. या संस्थेची सांपत्तिक स्थिती पूढील प्रमाणे – भाग भांडवल – १ कोटी २७ लाख रुपये, निधी – १ कोटी ६५ लाख रुपये, ठेवी – ६ कोटी १७ लाख रुपये, गुंतवणूक – ३ कोटी ८० लाख रुपये, कर्ज वाटप – ५ कोटी ४ लाख रुपये, खेळते भागभांडवल – ९ कोटी ४५ लाख रुपये, सी.डी. रेशो ५९.३६, थकबाकी ६ टक्के या प्रमाणे असून, निव्वळ नफा २७ लाख १५ हजार रूपयांचा झाला आहे.
Deola | सुराणा पतसंस्थेस २ कोटी ३७ लाखाचा नफा – अध्यक्ष प्रदीप सुराणा
यावेळी पूढील काळात जास्तीत जास्त ठेवी जमा करून व्यवसायिकांना कर्ज वाटप करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याची भावना संस्थापक दिलीप मेतकर, चेअरमन सुरेश नेरकर तसेच व्हा. चेअरमन केतन लुंकड, यांनी व्यक्त केली. याप्रसंगी कार्यकारी संचालक माधूरी मेतकर, अजय मेतकर, विष्णू जाधव, संतोष शिंदे, जाकीर शेख, तेजस मेतकर, नितीन आहेर, नानाजी चंदन, गिरीष कचवे, शुंभागी मेतकर, व्यवस्थापक संदिप देवरे, रोखपाल भुषण शिरसाठ, लिपिक प्रतिक्षा माळवाळ आदिसह ज्ञानेश्वर मेतकर, संदिप भामरे, उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम