सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्थेस ३१ मार्च अखेर विक्रमी २ कोटी ३७ लाख इतका ढोबळ नफा झाला असून, घसारा व विविध प्रकारच्या तरतुदी वजा जाता संस्थेस १ कोटी ३६ लाख ७७ हजार इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक डॉ. रमणलाल सुराणा, विद्यमान अध्यक्ष प्रदीप सुराणा व उपाध्यक्ष संजय कानडे यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती देताना डॉ. रमणलाल सुराणा यांनी सांगितले की, संस्थेचे अधिकृत भागभांडवल २ कोटी ५० लाख असून वसूल भागभांडवल २ कोटी २० लाख ३१ हजार आहे. संस्थेकडे विविध प्रकारचा २३ कोटी ७१ लाखाचा निधी जमा असल्याने संस्थेचा पाया किती भक्कम आहे हे दर्शवितो.
संस्थेच्या एकूण ५४ कोटी ७३ लाख ठेवी असून चालू आर्थिक वर्षात संस्थेच्या कर्जवाटपात विक्रमी ७ कोटी ८५ लाखाने वाढ होऊन एकूण कर्जवाटप ३४ कोटी ९६ लाख ६२ हजार इतके झाले आहे. संस्थेची आर्थिक वर्षात ८९ कोटीहून अधिक उलाढाल झालेली आहे . संस्थेचे खेळते भांडवल रु.८८ कोटी ७९ लाख इतके आहे. संस्थेने ५० कोटी ३७ लाखाची गुंतवणूक केलेली आहे. संस्थेच्या सी.डी रेशो ४०.०५% असून नेट एनपीए प्रमाण ०% व निव्वळ थकबाकी १.७१% इतकी अत्यल्प आहे. संस्थेचे संचालक मंडळ निस्वार्थीपणे कार्यरत असून ठेवीदारांचा व कर्जदारांचा दृढ विश्वास संस्थेवर आहे. संस्थेच्या ठेवीचा व्याजदर हा राष्ट्रीयकृत बँकापेक्षाही कमी असून जमा असलेल्या ठेवी ग्राहकांच्या विश्वासाची पावती आहे. पारदर्शी कारभार, तत्पर व विनम्र सेवा देण्यासाठी संस्था जिल्हाभर ओळखली जाते.
सोनेचांदी व्यवहारासाठी ग्राहक संपूर्ण जिल्ह्यातून येत असतात, अतिशय पारदर्शी व्यवहार, सोने चांदी तारण कर्जास कोणत्याही सहकारी बैंक पतसंस्थेपेक्षा सर्वात वाजवी व्याजदर ठेवला आहे. सोने चांदी तारण कर्जासाठी संस्थेने कुठेही नसलेली अशी सोने टेस्टिंग सुविधा चालू केली आहे त्यामुळे गडबड घोटाळा न होता सुरक्षित व्यवहार होतो. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप सुराणा यांनी सर्व सभासदांचे, सहकारी संचालकांचे आभार मानले. यावेळी उपाध्यक्ष संजय कानडे, संचालक रमेश संकलेचा, ईश्वर सुराणा, राजेंद्र सुराणा, निलेश कांकरिया, अशोक गुळेचा, सुनिल बुरड, मनोज ठोलीया संतोष लोढा, सुभाष सोनवणे, जनार्दन शिवदे, संचालिका सुरेखा सुराणा, शोभा सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम