सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा शहरातील बस स्थानक परिसर आणि शिवस्मारक उद्यान हे काही महाविद्यालयातील युवक-युवतींसाठी प्रेम प्रदर्शनाचे केंद्र बनले आहे. तर काही टवाळखोर येथे विनाकारण फेरफटका मारून महिला, मुलींना त्रास देत असतात. यावर आळा घालण्यासाठी दामिनी पथकाने बुधवारी (दि.५) रोजी अचानक धडक कारवाई करत अश्लील चाळे करणारे, विनाकारण फिरणारे आणि टवाळखोरी करणारे अशा सर्वांनाच चांगली अद्दल घडवली. देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्योती गोसावी यांच्यासह पथकाने बस स्थानक परिसरात संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या, प्रेमीयुगुल म्हणून बसलेल्या, तसेच प्रवाश्यांना अस्वस्थ करणाऱ्या टवाळखोरांची चौकशी करून त्यांना कठोर इशारा दिला.
टवाळखोर आणि अश्लील चाळे करणाऱ्यांना दणका
बस स्थानक परिसरात टवाळखोर उभे राहून महिलांना टोमणे मारणे, गैरवर्तन करणे, तसेच अश्लील हावभाव करणे यामुळे अनेक प्रवाश्यांना अडचण निर्माण होत होती. मात्र, पोलिसांनी या टवाळखोरांची नोेंद घेतली असून, भविष्यात अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
Deola | रात्री पीकाला पाणी भरायला गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू
स्थानिक नागरिकांचा प्रतिसाद
नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले असून, भविष्यातही अशी कारवाई सातत्याने व्हावी अशी मागणी केली आहे. विशेषतः विद्यार्थिनी आणि महिला प्रवाश्यांना या मोहिमेमुळे दिलासा मिळाला आहे.
पोलिसांचा इशारा
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, बस स्थानक, उद्यान किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्या, अश्लील चाळे करणाऱ्या किंवा महिलांना त्रास देणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. भविष्यात असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करून थेट गुन्हे दाखल करण्यात येतील.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम