सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | शेरी येथे गुरुवारी (दि.6) रोजी सकाळी साडे दहा वाजता एका 9 वर्षीय शाळकरी मुलीला अज्ञात इसमाने पैशाचे आमिष दाखवत जवळ येण्याचे खुणावत असल्याची घटना घडली आहे. अशा गैरवर्तन करणाऱ्याचा पोलिसांनी शोध घेऊन चोप द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. घटनास्थळी पोल्ट्री सुपरवायझर दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने संबंधित इसमाला शोधणे अवघड झाल्याने ग्रामपंचायतीच्या या गलथान कारभारावर येथील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Deola | देवळा तालुका काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेरी येथील अंकुश जयराम पवार यांची कन्या देवळा येथे अभिनव शाळेत इयत्ता चौथीत शिकत असून, सकाळी साडे दहा वाजता शाळेतून घरी येताना घराजवळील रस्त्यालगत कणकापूर गावाकडुन येणाऱ्या एका व्यक्तीने तिला पैसे देतो असे सांगत त्याच्याकडे बोलवत होता. त्या क्षणात पवार यांच्याकडे येत असलेल्या पोल्ट्री फार्मचा सुपरवायझर दाखल होताच सदर इसम फरार झाला. ही हकीकत मुलीने पोल्ट्री सुपरवायझर व वडिलांना रडत रडत सांगितल्याने संताप व्यक्त करण्यात आला. शेरी ग्रामपंचायतीने गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, ते गेल्या चार महिन्यापासून बंद असल्याचे समजले. यामुळे संबंधित माणसाचा शोध लागणे अवघड असल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम