सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या सुचनेप्रमाणे देवळ्याचे पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते, अपर पोलीस अधिक्षक कार्यालयाचे सपोनि पुष्पा आरणे यांच्या पथकाने (दि. 21) रोजी देवळा मालेगाव रोडवरील येथील हॉटेल वेलकम येथे धाड टाकून याठिकाणी चालु असलेल्या अवैध वैश्या व्यवसायावर कारवाई करुन दोन पिडीत महिलांची सुटका केली असुन, या प्रकरणी हॉटेल मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (दि. 21) रोजी अपर पोलीस अधिक्षक यांना मिळालेल्या माहितीनुसार देवळा पोलीस ठाणे हद्दीतील मालेगाव रोडजवळील हॉटेल वेलकम येथे हॉटेल मॅनेजर दिपक सुकदेव ठाकरे (रा. देवळा) हे हॉटेलवर गरजु महिलांना पैशांचे आमिष दाखवुन स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी वैश्या व्यवसायासाठी आणून त्यांना सदर हॉटेलमध्ये डांबून ठेवुन त्यांच्याकडुन वळजबरीने वैश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
Deola | विंचूर – प्रकाशा महामार्गाच्या कामाला अखेर मुहूर्त; पोलिस बंदोबस्तात काम सुरू
या माहितीनुसार पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते, पोलिस उपनिरिक्षक दामोदर काळे, ग्रेड पोलिस उपनिरिक्षक विनय देवरे, हवालदार इंद्रजित बर्ड, नितिन बाराहाते, पोलीस अंमलदार श्रावन शिंदे, संदिप चौधरी, महिला पोलीस अंमलदार माधुरी पवार, स्वाती चव्हान तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक कार्यालयातील सपोनि पुष्पा आरणे, पोलीस अंमलदार योगेश तनपुरे, ऋषिकेश सपकाळे, मनोहर मोहारे, सुनिल गांगुर्डे, सुनिल जगताप, पोलिस हवालदार आश्विन धोत्रे या पथकाने सापळा रचुन हॉटेल वेलकमवर रात्री 10.35 वाजता छापा टाकुन हॉटेलचे मॅनेजर दिपक सुकदेव ठाकरे यांना ताब्यात घेतले. तसेच वैश्या व्यवसायासाठी डांबुन ठेवलेल्या महिला वरील मजल्यावर असल्याची खात्रीलायक माहीती मिळाल्याने पथकातील महिला अंमलदार यांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली.
अल्पवयीन प्रेमीयुगलांचे ‘Wel Come ‘ ; पालकांनो ‘लेकरांची’ काळजी घ्या
पिडीत महिला बांग्लादेशी असल्याचा संशय
यावेळी सदर ठिकाणी वैश्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य तसेच रोख रुपये व सोने चांदीचे दागिने व मोबाईल फोन मिळून आले. सदर डांबुन ठेवलेल्या महिलांकडे विचारपुस करता त्यांनी सांगितले की, आम्हाला वैश्या व्यवसायासाठी हॉटेल मॅनेजर दिपक सुकदेव ठाकरे यांनी बोलावुन घेवुन सदर ठिकाणी पैसे देण्याचे बदल्यात डांबुन ठेवल्याचे सांगितले. पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर महिलांची सुटका केली असुन हॉटेल मॅनेजर दिपक सुकदेव याचेविरुद्ध पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचे फिर्यादीवरुन देवळा पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3.4.5.6 व भारतीय न्यायसंहिता 2023 च्या कलम 143(1), 143(2), 143 (3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॅनेजर दिपक ठाकरे यास न्यायालयाने सोमवार (दि. 24) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, अधिक तपास पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते करीत आहेत. सदर गुन्ह्यातील पिडीत महिला या बांग्लादेशी असल्याचा संशय असुन त्यादृष्टीने सखोल तपास सुरु आहे. दरम्यान, याबाबत हॉटेल वेलकम भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिली असल्याची माहिती प्रफुल्ल आहेर यांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम