Deola | ‘दि देवळा मर्चंट्स को. ऑपरेटिव्ह’ बँकेची लाखोंची फसवणूक

0
71
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  बँकेत तारण ठेवलेले सोने हे शुद्ध व योग्य वजन असल्याचे खोटे अहवाल बँकेला वेळोवेळी सादर करून देमको बँकेची तब्बल ५४ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार देवळा येथे घडला असून, याबाबत देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळा पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, येथील ‘दि देवळा मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक लि.’च्या देवळा शाखेतील बँकेचे व्हॅल्यूअर राजेंद्र मोतीराम सोनवणे (वय ५० रा. कापशी ता.देवळा) यांनी कर्जप्रकरण पास करताना बँकेचे खातेदार यांच्या सोने-चांदी तारण ठेवताना सोने व चांदीची शुद्धता प्रामाणिकपणे ठरविणे बंधनकारक असताना सोनवणे यांनी काही खातेदारांशी संगनमत करून बँकेचा विश्वासघात केला.

Deola | लाडक्या बहीणींची धावपळ कमी होणार; केदा आहेरांच्या जनसेवा कार्यालयात योजनेसाठी विशेष कक्ष

सप्टेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत या बँकेच्या तब्बल २७ खातेदारांची संगनमत करून कर्जप्रकरण करताना या खातेदारांचे सोने गहाण ठेवतेवेळी सदोष, त्रुटी व तफावत असलेले किंवा बनावट व दुय्यम सोने बँकेत तारण म्हणून ठेवून घेतले आणि हे सोने शुद्ध व योग्य वजन असल्याचा खोटा अहवाल बँकेला सादर केला. या अहवालावरून बँकेने नमूद २७ संशयित आरोपी खातेदारांना ५४ हजार ७४ हजार रु. कर्ज मंजूर केले. या २७ जणांत कापशी येथील सहा, गुंजाळनगर येथील सहा, देवळा येथील पाच, सुभाषनगर व रामेश्वर येथील प्रत्येकी दोन तर भिलवाड, वाखारवाडी, पिंपळगाव (वा), सरस्वतीवाडी, वरवंडी येथील प्रत्येकी एका खातेदारांचा यात समावेश आहे. त्यामुळे बँकेचे एकूण ५४ लाख ७४ हजार रुपये व अधिक येणे व्याज रुपयांची फसवणूक झाल्याचा सदर गुन्हा शुक्रवार (दि.५) रोजी दाखल करण्यात आला. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील पुढील तपास करत आहेत.

Deola Crime | देवळ्यात चोरांचा सुळसुळाट; भरदिवसा चोरट्यांनी सेवानिवृत्त शिक्षकाला लुबाडले

“देमको बँकेत गेल्या अनेक वर्षांपासून एकच गोल्ड व्हॅल्यूअर होता. आमच्या नवीन संचालक मंडळाने अजून एकाची नेमणूक केल्यावर सोनेतारण विभाग अधिकारी यांना शंका आली. त्यांनी तसे कळवले असता तातडीने सर्व बॅगांचे पुन्हा इनकॅमेरा मूल्यांकन केले. यातील सदोष प्रकरणांबाबत देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कर्मचारी व संचालक मंडळाच्या सजगतेने सदर प्रकरण उघडकीस आले असून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.” – कोमल कोठावदे, (चेअरमन. देमको बँक देवळा)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here