देवळा : देवळा नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी राजीनामा दिल्याने या रिक्त जागेसाठी गुरुवारी ( दि २९ ) रोजी निवड करण्यात येणार असून नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची उत्सुकता लागून राहिली आहे.
देवळा नगरपंचायतीच्या अध्यक्षा भारती अशोक आहेर यांनी (दिनांक २१) रोजी आवर्तन पद्धती नुसार आपला राजीनामा दिला असून , त्याच बरोबर उपाध्यक्ष जितेंद्र रमण आहेर यांनी देखील आवर्तन पद्धती नुसार (दि १२ ) रोजी राजीनामा दिल्याने या दोनही रिक्त झालेल्या जागेसाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करणेकामी विशेष सभेचे आयोजन करणेत संदर्भात नोटीस प्रशिध्द केली आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीकडे देवळा शहर वासीयांचे लक्ष लागून असून, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. दरम्यान नगरपंचातीच्या निवडणुकीत तत्कालीन उपाध्यक्ष जितेंद्र आहेर व त्यांच्या सुविद्य पत्नी सुलभा आहेर हे दोन्ही निवडून आल्याने अध्यक्ष पदाची माळ नगरसेविका सुलभा आहेर यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे खरे चित्र ( दि २९ ) स्पष्ट होईल .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम