देवळा नगरपंचायतीच्या वतीने “अमृत कलश यात्रा ”

0
8

देवळा ; “मेरी मिट्टी मेरा देश” उपक्रमांतर्गत देवळा नगरपंचायतीच्या वतीने “अमृत कलश यात्रा ” काढण्यात आली. नगरपंचायत कार्यालयाजवळ नगराध्यक्षा सुलभा आहेर यांच्या हस्ते कलशाची पूजा करून त्यामध्ये शहरातील नागरिकांनी आणलेली मुठ – मुठ माती टाकून कलश मातीने भरण्यात आला. त्याननंतर त्याची देवळा शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

या उपक्रमात कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयातील विद्यार्थी , शिक्षक, मुख्याध्यापक, अंगणवाडी कार्यकर्ती , आरोग्य कर्मचारी आदींनी आपला सहभाग नोंदवला.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार ,नगरसेवक मनोज आहेर,माजी नगरसेवक दिलीप आहेर , मुख्याधिकारी शामकांत जाधव, कार्यालयीन अधीक्षक जनार्दन येवले, पाणी पुरवठा अभियंता सुयोग पाचपाटील, लेखापाल नितीन भवर, सुधाकर आहेर , लेखापरीक्षक जुगल घुगे, लिपिक वसंत आहेर, शरद पाटील, शिपाई दीपक गोयल आदींसह नागरिक उपस्थित होते .


देवळा शहरात नगरपंचायतीच्या वतीने “अमृत कलश यात्रेचा शुभारंभ करतांना उपनगराध्यक्ष अशोक आहेर ,अतुल पवार ,मनोज आहेर ,मुख्याधिकारी शामकांत जाधव आदी (छाया – सोमनाथ जगताप)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here