देवळा मर्चंट्स बँकेने भंगार विकून बनवली सुसज्ज कॅबिन

0
45
देवळा मर्चंट्स बँकेच्या नूतन आधुनिक कॅबिनचे उदघाटन करतांना नितीन शेवाळकर राजेंद्र वडनेरे समवेत संचालक मंडळ ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा | सोमनाथ जगताप
मर्चंट बँकेच्या गेल्या अनेक दिवसापासून पडून असलेल्या विविध निकामी वस्तू एकत्रित करून भंगारत विकून त्यातून उपलब्ध झालेल्या पैशातून कर्मचाऱ्यांसाठी बँकेच्या वरील रिकाम्या हॉलमध्ये कमी खर्चात सुसज्य केबिन्स तयार करून ग्राहकांना सुटसुटीत अशी सुविधा देण्याचा मानस केला असून, बँकेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त सदर केबिनचे उद्घाटन सभासद नितीन शेवाळकर व राजेंद्र वडनेरे यांच्या हस्ते करण्यात आले.

देवळा मर्चंट्स बँकेच्या नूतन आधुनिक कॅबिनचे उदघाटन करतांना नितीन शेवाळकर राजेंद्र वडनेरे समवेत संचालक मंडळ ( छाया -सोमनाथ जगताप )

मागील वर्षी बँकेची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात आली. कोरोना काळात कर्जदारांकडून थकबाकी वसूल न झाल्याने मधल्या काळात बँकेबद्दल अनेक समज गैरसमज पसरवण्यात आले. मात्र बँकेची सध्याची आर्थिक परिस्थिती सुस्थितीत असून ठेविदारांमधला विश्वास वाढविण्यात बँकेच्या संचालक मंडळाला यश प्राप्त झाले आहे, येत्या दोन महिन्यात कर्ज वसुली मोहीम अतिशय कठोररीत्या राबविण्यात येणार असून बँकेला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्याचा मानस यावेळी संचालक मंडळाने वर्धापन दिनानिमित्त व्यक्त केला आहे.

वर्धापन दिनानिमित्त संचालक राजेश मेतकर यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत सत्यनारायण पूजन करण्यात आली . यावेळी चेअरमन कोमल कोठावदे ,व्हाईस चेअरमन डॉ . प्रशांत निकम ,संचालक योगेश वाघमारे, हेमंत अहिरराव ,प्रमोद शेवाळकर, केदारनाथ मेतकर, अनिल धामणे, भगवान बागड, सुभाष चंदन, मनीषा शिनकर ,नलिनी मेतकर आदींसह सभासद ,कर्मचारी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here