देवळा शहरात मनसेच्या वतीने ‘एक सही संतापाची’ अभियान

0
52
देवळा ; येथे मनसेचे च्या वतीने 'एक सही संतापाची’ ह्या अभियानाप्रसंगी उपस्थित जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, उपजिल्हाध्यक्ष नाना सांगळे, ग्रा. उपजिल्हाध्यक्ष नाना विसपुते, विधानसभा अध्यक्ष नितीन थोरे, महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, दत्ता पवार आदी (छाया - सोमनाथ जगताप)

देवळा : राज्यातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून जनतेमध्ये संताप आणि रोष आहे. राजकारण्यांबाबत विश्वासार्हता राहिलेली नाही आणि त्यामुळे मनात असलेला संताप स्वाक्षरींच्या माध्यमातून व्यक्त व्हावा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी द्यावी, यासाठी देवळा शहरात मनसेच्या वतीने ‘एक सही संतापाची’ हे अभियान राबविण्यात आले.

देवळा ; येथे मनसेचे च्या वतीने ‘एक सही संतापाची’ ह्या अभियानाप्रसंगी उपस्थित जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, उपजिल्हाध्यक्ष नाना सांगळे, ग्रा. उपजिल्हाध्यक्ष नाना विसपुते, विधानसभा अध्यक्ष नितीन थोरे, महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, दत्ता पवार आदी (छाया – सोमनाथ जगताप)

मनसेच्या या आगळयावेगळय़ा आंदोलनास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. देवळा पाच कंदील परिसरात यावेळी मोठे फलक उभारण्यात आले होते. नागरिकांच्या मनात राजकारण्यांबाबत असलेला संताप व्यक्त करण्यासाठी हे एक माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. राजकारणाच्या या चिखलात न पडता राज ठाकरे यांना नेतृत्वाची संधी जनतेने द्यावी असे मत यावेळी मनसेचे माजी तालुका अध्यक्ष दत्ता पवार यांनी व्यक्त केले.

जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, उपजिल्हाध्यक्ष नाना सांगळे, ग्रा. उपजिल्हाध्यक्ष नाना विसपुते, विधानसभा अध्यक्ष नितीन थोरे, महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैशाली सोनवणे, यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम देवळा येथे राबविण्यात आली. यावेळी राहुल बच्छाव, सचिन शेवाळे, प्रवीण देवरे, दिगंबर हिरे, सुदर्शन पवार, हरी चव्हाण, संदीप गांगुर्डे, महेश बोरसे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here