लोहोणेर ते पिंपळगावं रस्त्याची दयनीय अवस्था ; आमदार डॉ राहुलआहेर यांना निवेदन

0
35
लोहोणेर ते पिंपळगावं या रस्त्याची झालेली अत्यंत दयनीय अवस्था ( छाया- सोमनाथ जगताप )

देवळा ; लोहोणेर ते पिंपळगावं या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडांनी अतिक्रमण केले असून, जागोजागी मोठं मोठे खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावर सतत लहान मोठे अपघात घडत असल्याने हा रस्ता रुंदीकरण करण्यात येऊन दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी खुंटेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजीव पगार यांनी आमदार डॉ राहुल आहेर यांच्याकडे केली आहे.

लोहोणेर ते पिंपळगावं या रस्त्याची झालेली अत्यंत दयनीय अवस्था ( छाया- सोमनाथ जगताप )

लोहोणेर विजयनगर पिंपळगावं या रस्त्याचे पंधरा वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काम करण्यात आले होते . मात्र त्यानंतर संबंधित विभागाने या रस्त्याकडे पूर्णपणे पाठ फिरविल्या मुळे या रस्त्याची अत्यन्त दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर सतत चार चाकी, दुचाकी तसेच शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ असते . शेतकऱ्यांना आपला माल ने आन करण्यासाठी हा रस्ता अत्यन्त सोईस्कर आहे. या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी झाडांनी विळखा घातल्याने वाहन चालवणे अतिशय जिकरीचे झाले आहे. काही ठिकाणी अत्यन्त धोकादायक वळणे असून, वाहन चालक जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करीत असतात .

चांदवड देवळा व सटाणा या तिन्ही तालुक्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने चांदवड देवळ्याचे आमदार डॉ राहुल आहेर यांनी या संदर्भात लक्ष घालून सदर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ‘ आर आणि डी ‘योजेनेमधून रुंदीकरण सह दुरुस्त करावा अशी मागणी खुंटेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजीव पगार यांनी केली आहे . अन्यथा रस्ता दुरुस्ती साठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा शेवटी देण्यात आला आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here