तालुका खरेदी विक्री संघाचे माजी आमदार कै शांताराम तात्या आहेर असे नामकरण; चेअरमन कैलास देवरे

0
37
तालुका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन कैलास देवरे समवेत संचालक मंडळ आदी (छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : देवळा तालुका खरेदी विक्री संघाचे नामविस्तार करण्यात येऊन संघाचे संस्थापक अध्यक्ष , माजी आमदार कै शांताराम तात्या आहेर असे नामकरण करण्यात यावे ,असा सर्वानुमते ठराव येथील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या रविवारी दि २४ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला .

तालुका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन कैलास देवरे समवेत संचालक मंडळ आदी (छाया -सोमनाथ जगताप )

रविवारी दि २४ “रोजी सकाळी १० वाजता संघाचे चेअरमन कैलास आनंदा देवरे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरण पार पडली. यावेळी संघाच्या नामविस्तारावर चर्चा करण्यात येऊन नामकरणास सर्वानुमते संमती देण्यात आली .तसेच संघामार्फत सभासदांच्या अडीअडचणीच्या बाबतीती , आर्थिक परिस्थिती आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली . व्यवस्थापक गोरखनाथ आहेर यांनी अहवाल वाचन केले.

याप्रसंगी व्हा चेअरमन अमोल आहेर ,संचालक योगेश आहेर, संजय गायकवाड, काशिनाथ पवार, सुलभा आहेर,डॉ राजेंद्र ब्राम्हण कार, नानाजी आहेर,हंसराज जाधव,अर्चना आहेर ,चिंतामण आहेर, रवींद्र जाधव,साहेबराव सोनजे ,सुवर्णा देवरे आदींसह बाजार समितीचे माजी संचालक जगदीश पवार,जितेंद्र आहेर , पंडितराव निकम , संघाचे माजी संचालक महेंद्र आहेर,अतुल आहेर ,संजय साळवे , एकनाथ आहेर,जगन आहेर, दीपक पवार, सुनील आहेर, दीपक निकम ,विनायक आहेर, विनोद देवरे,सचिन सूर्यवंशी, गुलाब आहेर आदी सभासद उपस्थित होते . आभार प्रदीप आहेर यांनी मानले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here