सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | खर्डे व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी विद्युत पुरवठा खंडित होत आहे. यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाल्याने याठिकाणी अखंडित वीज पुरवठा होणेकामी भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने देवळा येथील वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता जितेंद्र देवरे यांना भेटून निवेदन सादर केले. यावेळी देवरे यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देवरे यांनी शिष्टमंळाला दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील खर्डे सह वाजगाव, वडाळा, कणकापूर, शेरी, वार्षी, कांचने व हनुमंत पाडा या अतिदुर्गम भागात सायंकाळच्या वेळेत वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. तर गेल्या काही दिवसांपासून विज वितरण कंपनीकडून विजेची मागणी वाढल्याने व इतर तांत्रिक कारणामुळे रोज सायंकाळी विज पुरवठा खंडित केला जात आहे. मात्र त्याला काळ वेळ नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळ्याचे दिवस व सध्या कांदा लागवड सुरू असल्याने रात्री अपरात्री वीज पुरवठा सुरू होतो.
Deola | लाडक्या बहीणींची धावपळ कमी होणार; केदा आहेरांच्या जनसेवा कार्यालयात योजनेसाठी विशेष कक्ष
त्यात या भागात बिबट्याच्या संचार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी जिल्हा नेते केदा आहेर यांची भेट घेऊन ही समस्या मार्गी लावण्यासाठी गळ घातली. आहेर यांनी तात्काळ शिष्टमंडळाला सोबत घेत वीज वितरण कंपनीच्या देवळा येथील उपविभागीय कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना खर्डे व परिसरातील विजेची समस्या मार्गी लावण्याचे गाऱ्हाणे मांडले. यावेळी उपस्थित सहायक अभियंता जितेंद्र देवरे यांनी तात्काळ वरिष्ठांशी बोलून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी खर्डे सरपंच सरपंच जिभाऊ मोहन, उप सरपंच सुनील जाधव, जितेंद्र पवार, गोरख जाधव, हर्षद मोरे कणकापूरचे माजी उपसरपंच माणिक शिंदे, भालचंद्र पवार, श्रावण अप्पा, नामदेव हेंबाडे आदी शेतकरी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम