जाणीव पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

0
24
देवळा येथील जाणीव पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करतांना चेअरमन जितेंद्र आहेर व्यासपीठावर संचालक मंडळ आदी (छाया -सोमनाथ जगताप ) `

देवळा ; येथील जाणीव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन जितेंद्र आहेर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (२८) रोजी बाजार समितीच्या व्यापारी संकुलात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली .

देवळा येथील जाणीव पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करतांना चेअरमन जितेंद्र आहेर व्यासपीठावर संचालक मंडळ आदी (छाया -सोमनाथ जगताप ) `

संस्थेने अल्पावधीत आर्थिक प्रगती केली असून , १ हजार ७९० सभासद असलेलल्या संस्थेकडे आज अखेर ९ कोटी ३५ लाख ४५ हजार ५६७ रुपयांच्या ठेवी आहेत . संस्थेने होतकरू व्यावसायिकांना कर्ज वाटप केले असून ,वसुली देखील चांगली आहे . संस्थेची प्रगती बघून वार्षिक सर्वसाधारण सभेत दादाजी आहेर , हिरामण आहेर , चिंतामण आहेर , धनंजय आहेर , अनिल आहेर ,अतुल आहेर , काशिनाथ आहेर आदी सभासदांनी कौतुक केले .

संस्थेला अहवाल वर्षातील कामकाजाचा लेखापरीक्षक आर बी बाविस्कर यांनी ऑडिट वर्ग “अ ” दिला आहे . अहवाल वाचन व्यवस्थापक दिलीप आहेर यांनी केले . सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमन जितेंद्र आहेर यांनी समर्पक उत्तरे दिली . यावेळी संस्थापक भाऊसाहेब पगार , व्हा चेअरमन राजीव पगार , मानद कार्यकारी संचालक लक्ष्मीकांत आहेर , संचालक सर्वश्री सतीश कोठावदे , कैलास देवरे , समाधान आहेर , नरेंद्र हिरे , सुनील आहेर , वसंत आढाव , योगेश सावकार , डॉ सतीश वाघ , रघु नवरे , योगिता सूर्यवंशी , मेघा भदाणे आदींसह सभासद ,ठेवीदार उपस्थित होते . शुभम आहेर , शरद खैरणार , योगेश निकम , दीपक आहेर या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले . राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here